S M L

'महाराष्ट्र रजनी' चुकीच्या ठिकाणीच !, आग विझली आता राजकारण पेटलं

Sachin Salve | Updated On: Feb 15, 2016 10:47 PM IST

fire215 फेब्रुवारी : मुंबईत गिरगाव चौपाटीवर लागलेली आग काल रात्रीच विझली, पण आता राजकारण मात्र पेटलंय. 'महाराष्ट्र रजनी'च्या कार्यक्रमासाठी गिरगाव चौपाटीची जागा चुकीची निवडली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. तर मंत्रालयाला आग लागली तेव्हा विरोधकांनी आमच्यावर आरोप केले होते. पण आग लागू शकते, प्रत्येक वेळी ती लावली जात नाही, असा टोमणा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी मारलाय.

मेक इन इंडियाच्या कार्यक्रमामध्ये लागलेल्या आगीने राज्य सरकारचं नाक कापलं आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.आगीबद्दलचा अहवाल आठवड्याभरात येणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या आयोजनात सगळे नियम पाळले गेले, असं इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी विझक्राफ्टने निवेदन काढून स्पष्ट केलंय.

एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारवर आगपाखड करत असताना शिवसेना आणि भाजप मात्र जवळ येतायत. मंुबई-महाराष्ट्रासाठी जे काही चांगलं कराल त्यामध्ये शिवसेना आणि प्रत्येक शिवसैनिक तुमच्या खाद्यांला खांदा लावून उभा राहील, अशी ग्वाही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी दिली. मेक इन इंडियाच्या सांगता कार्यक्रमात त्यांनी ही ग्वाही दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2016 10:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close