S M L

सातार्‍याच्या वीरपुत्रावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Samruddha Bhambure | Updated On: Feb 16, 2016 12:07 PM IST

सातार्‍याच्या वीरपुत्रावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

सातारा - 16 फेब्रुवारी : सियाचीन इथल्या हिस्मस्खलात शहीद झालेला सातार्‍याचा वीरपुत्र सुनील सुर्यवंशी यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) त्यांच्या मस्करवाडी या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सियाचिनमध्ये तैनात असलेल्या सूर्यवंशी यांच्यासह 9 जवान 3 फेब्रुवारीला हिमस्खलनात शहीद झाले. तर दहावे जवान हनुमंतप्पा यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सुनील सुर्यवंशी यांचं पार्थिव लष्करी वाहनातून आज सकाळी त्यांचे मूळगाव मस्करवाडीत आणण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली. सुनील यांच्या अंत्ययात्रेत मोठा जनसागर लोटला आहे. अंत्ययात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळया काढण्यात आल्या होत्या. 'सुनील सूर्यवंशी अमर रहे, वंदे मातरम् , अशा घोषणांमध्ये शहीद सूनील यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पंचक्रोषीतील लोक मोठ्या संख्येन सूनील यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले आहे.

मद्रास रजिमेंटकडून लष्करी मानवंदना दिल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी वीरपुत्राला अखेरचा सलाम करताना अनेकांचे डोळे पाणावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2016 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close