S M L

तुझ्यासाठी काय पण..,सात प्रेयसींसाठी चोरी, घरफोड्या !

Sachin Salve | Updated On: Feb 16, 2016 09:00 PM IST

तुझ्यासाठी काय पण..,सात प्रेयसींसाठी चोरी, घरफोड्या !

 

नागपूर - 16 फेब्रुवारी : 'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं...'पण इथं एका भामट्याने प्रेमाची व्याख्याच बदलू टाकलीये. या भामट्याला एक नव्हे तर तब्बल सात प्रेयसी आहे. आणि या सात प्रेयसींना खूश ठेवण्यासाठी घरफोड्या करण्याचा मार्ग पत्कारला. त्याच्याकडून तब्बल 17 मोबाईल, दागिणे आणि बाईक नागपूर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ओमप्रकाश खांडवे असं या अट्टल चोराचं नाव आहे.

प्रेयसीसाठी काय पण करण्यासाठी प्रियकर नेहमी एका पायावर तयार असतो. पण, ओमप्रकाश खांडवे या भामट्याने तर काय पणाची हद्दच केली. याला एक नव्हे तर सात प्रेयसी आहे. आणि आपल्या या सातही प्रेयसींना महागडे गिफ्ट देण्याचा छंदच या भामट्याला लागला होता. पण, ही हौस पूर्ण कऱण्यासाठी ओमप्रकाशने गुन्हेगारीचा मार्ग निवडला.

सुरुवातील त्याने रेल्वेत चोरी करायचा. प्रवासात सोनसाखळी,मोबाईल लुटायचा. पण त्यानंतरही हाैस फिटत नसल्यामुळे त्याने घरफोड्या करण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांत नागपूर आणि परिसरात या चोरट्यानं तब्बल नऊ ठिकाणी घरफोडी केलीय. घरातील मिळेल त्या वस्तू लंपास करायच्या आणि त्याची विक्री करायची, मिळालेल्या पैशात आपल्या सात गर्लफ्रेण्ड्सची तो हौस भागवायचा. मुळचा बुलडाणा जिल्ह्यातला हा चोरटा विदर्भ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही चोरी करायचा.

पण याची चोरीच याला महागात पडली. चोरलेला मोबाईल विक्री करायला गेलेल्या या चोरट्याला मानकापूर पोलिसांनी गजाआड केलं. त्याच्याकडून 17 महागडे मोबाईल, दागिणे, टीव्ही, लॅपटॉप आणि बाईक्सही पोलिसांनी पोलीसांनी जप्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2016 09:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close