S M L

'मेक इन इंडिया'त खासदार हेमामालिनींचं नृत्य चुकीचं, काँग्रेसचा आक्षेप

Sachin Salve | Updated On: Feb 16, 2016 10:44 PM IST

'मेक इन इंडिया'त खासदार हेमामालिनींचं नृत्य चुकीचं, काँग्रेसचा आक्षेप

मुंबई - 16 फेब्रुवारी : मेक इंडियाच्या कार्यक्रमात परदेशी पाहुण्यांसमोर खासदार हेमामालिनी यांनी नृत्य सादर करणे हे चुकीचं आहे असा आक्षेप काँग्रेसजनांनी घेतलाय.

मुंबई महापालिकेच्या सभागृहात मेक इन इंडियावरून बराच गदारोळ झाला. हेमामालिनींच्या नृत्यावर काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेतला. खासदार महिलेने परदेशी पाहुण्यांसमोर नाचणं अयोग्य आहे, असं काँग्रेसच्या नगरसेविका वकार उन्निसा यांचं म्हणणं आहे. परदेशी पाहुण्यांसमोर लावणी करणार्‍या महिलांना नाचवलं, असाही त्यांचा आरोप आहे. काँग्रेसच्या या भूमिकेचा भाजपने कडाडून विरोध केलाय. काँग्रेसची ही वैचारिक दिवाळखोरी आहे अशी टीका भाजप नगरसेवक विनोद शेलार यांनी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2016 10:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close