S M L

आमिर खान जलयुक्त शिवारचा 'ब्रॅन्ड अॅम्बेसिडर'?

Samruddha Bhambure | Updated On: Feb 17, 2016 09:28 AM IST

amir khan_bollywood

मुंबई – 17 फेब्रुवारी : असहिष्णुतेच्या वक्तव्यावरून संघ परिवाराच्या टिकेचे लक्ष्य बनलेला बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा ब्रँड अॅम्बेसिडर होणार आहे. यासंदर्भात आज (बुधवारी) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

'मेक इन इंडिया' सप्ताहाच्या उद्घाटनाला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहभोजन दिले होते. त्यावेळी आमिर खानने पंतप्रधानांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई करून आमिरविषयीची कटूता संपविली. पंतप्रधानांबरोबरच्या चर्चेवेळी मुख्यमंत्र्यांनी आमीरला राज्याच्या जलयुक्त शिवार योजनेचा ब्रॅड अॅम्बेसिडर बनण्याची विनंती केली होती. आमीरनेही मुख्यमंत्र्यांची विनंत लगेच मान्य केल्याचीह माहिती मिळते आहे.

आमिरची 'महाराष्ट्र रजनी' या कार्यक्रमातील उपस्थितीही सर्वांना थक्क करणारी होती. त्यामुळे आमिर खानचे भाजप सरकारशी पुन्हा सख्य जुळल्याचे चित्र दिसू लागलं आहे.आमीर खान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथिगृहात भेट होणार आहे. त्यामुळे या भेटीनंतर नेमकी कोणती घोषणा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या भेटीचा अर्थ जलयुक्त शिवारच्या ब्रॅन्ड अॅम्बेसिडरपदी आमीरची निवड हाच असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 17, 2016 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close