S M L

निलंबन मागे घेण्याची मागणी, अविश्वास प्रस्ताव बारगळला

10 फेब्रुवारीमहिला विधेयकाला विरोध करताना गोंधळ करणार्‍या 7 खासदारांचे राज्यसभेतून निलंबन करण्यात आले होते. या खासदारांचे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी, समाजवादी, डावे पक्ष आणि भाजपने केली आहे. खासदारांनी माफी मागावी गोंधळ घालणार्‍या 7 खासदारांनी सभागृहाची बिनशर्त माफी मागावी. मगच त्यांचे निलंबन रद्द करण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या 7 राज्यसभा सदस्यांचे निलंबन परत घेण्याबाबत आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रणव मुखर्जी यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण आणि इतर नेते उपस्थित होते. राज्यसभेत गोंधळ घातल्याने या अधिवेशनापुरते या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.तर यापैकी 4 खासदारांनी माफी मागण्यास नकार दिल्याचे समजते. दरम्यान खासदारांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी लोकजनशक्ती पक्षाच्या नेत्यांनी संसदेबाहेर जोरदार आंदोलन केले. अविश्वास प्रस्ताव बारगळलाअविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही, त्यामुळे अविश्वास प्रस्ताव मांडणे शक्य नाही, असे मुलायम सिंग यादव यांनी स्पष्ट केले आहे. लालूप्रसाद यादव आणि मुलायमसिंग यादव यांच्या विरोधाला न जुमानता, सरकारने महिला आरक्षण विधेयक काल राज्यसभेत मंजूर करून घेतले.तसेच गोंधळ घालणार्‍या सपा, राजदच्या खासदारांनाही काल मार्शल्सकरवी सभागृहाबाहेर नेण्यात आले. त्यामुळे आता लालू, मुलायम यांनी पुढची चाल म्हणून त्यांनी अविश्वासदर्शक ठराव आणण्याची तयारी चालवली होती. त्यासाठी त्यांनी भाजपचीही मदत मागितली होती. पण कुठलीही चर्चा न करता अशी घाई करण्यात अर्थ नसल्याचे भाजपचे म्हणणे आहे. अर्थातच भाजपचा पाठिंबा नसल्याने आज राष्ट्रपतींची भेट घेणार नाही, असे मुलायम सिंग यादव यांनी सांगितले आहे.ममता बॅनर्जी यांचा यू टर्न आता या मुद्द्यावरुन तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी यू टर्न घेतला आहे. काल तृणमूल काँग्रेसच्या दोन्हीही खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. आज मात्र ममता बॅनर्जी यांनी आपला महिला आरक्षणाला पाठिंबा आहे. पण आम्हाला मतदानाबाबत काहीही माहिती दिली गेली नव्हती, असे म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2010 10:05 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2010 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close