S M L

एक्स्प्रेस वेवर 22 फेब्रुवारी ते 11 मार्च ब्लॉक, वाहतूक जुन्या मार्गावर

Sachin Salve | Updated On: Feb 18, 2016 06:19 PM IST

pune-mumbai-express-highwayपुणे - 18 फेब्रुवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर धोकादायक दरडी काढण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय यासाठी पुढचे काही दिवस एका ठराविक काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे बंद ठेवण्यात येणार आहे.

22 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत कमी गर्दीच्या वेळी मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येईल. याकाळात जुन्या मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक वळवण्यात येणार आहे.

एक्स्प्रेसवेवरचे अपघात टाळावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून दरडी काढण्याचं काम सुरू होतं. या भागात जाळी लावण्यासाठी आधुनिक यंत्रणा सज्ज झालीये.

ब्लॉकच्या काळात वाहतूक जुन्या महामार्गावर वळवण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काम सुरू आहे आणि वाहनचालकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. या आधीही दुरस्तीचं काम हाती घेण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 18, 2016 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close