S M L

मेक इन इंडियात शेतकरी अग्रक्रमावर राहिला पाहिजे -डॉ.स्वामीनाथन

Sachin Salve | Updated On: Feb 18, 2016 10:52 PM IST

मेक इन इंडियात शेतकरी अग्रक्रमावर राहिला पाहिजे -डॉ.स्वामीनाथन

सिंधुदुर्ग - 18 फेब्रुवारी : स्वदेशीचा नारा देत मेक इन इंडियाची खरी सुरुवात महात्मा गांधींनी चरख्यावर सूत कातून केली होती.. सध्याच्या मेक इन इंडियात शेतकरी अग्रक्रमावर राहिला पाहिजे अशी अपेक्षा भारताच्या हरीत क्रांतीचे जनक आंतरराष्ट्रीय कृषीशास्त्रज्ञ डॉ.एम.एस.स्वामीनाथन यानी व्यक्त केली आहे.

शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्या ही अत्यंत दुदैर्वी गोष्ट आहे. 2006 साली आम्ही सादर केलेल्या शिफारसी जर अमलात आणल्या तर शेतकरी आत्महत्या थांबतील असा दावाही डॉ. स्वामीनाथन यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत केलाय.

हरीत क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांची खंत

- मेक इन इंडिया सुरू झालं असलं तरी आजही आपण एक कोटी टन डाळी आयात करतो.

- मेक इन इंडियाची खरी सुरुवात महात्मा गांधींचा चरखा आणि खादीने केली.

- मेक इन इंडियात शेतकर्‍याला प्राधान्य हवं.

- शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही देशातली आजची सर्वात मोठी शोकांतिका

- कृषी आणि किसान यामध्ये सरकार गफलत करतय.

- शेती उत्पादन वाढलं पण शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारली नाही.

- राष्ट्रीय कृषक आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या तर आत्महत्या थांबतील.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 18, 2016 10:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close