S M L

लोकलच्या धडकेत रेल्वेच्या चार कर्मचार्‍यांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Feb 19, 2016 11:01 AM IST

लोकलच्या धडकेत रेल्वेच्या चार कर्मचार्‍यांचा मृत्यू

मुंबई -19 फेब्रुवारी : मध्य रेल्वेवर आज (शुक्रवारी) सकाळी सीएसटीच्या दिशेने जाणार्‍या लोकलच्या धडकेत 4 रेल्वे चर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. घाटकोपर-विद्याविहार स्थानकादरम्यान ही घटना घडली. गोकूळ(18), श्रवण (18), नाना(27) आणि काशिनाथ (19) अशी त्यांची नावं आहेत.

हे चारही रेल्वे कर्मचारी कंत्राटी कामगार होते. रात्रपाळी संपवून घरी परतत असताना चार कर्मचार्‍यांना लोकलने धडक दिली. यात चारही कर्मचारी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना लगेचच राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2016 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close