S M L

अमेरिकेत टाईम्स स्क्वेअर शिवरायांच्या जयघोषाने निनादला

Sachin Salve | Updated On: Feb 19, 2016 06:26 PM IST

अमेरिकेत टाईम्स स्क्वेअर शिवरायांच्या जयघोषाने निनादला

न्यूयॉर्क - 19 फेब्रुवारी : देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा सुरू आहेच पण परदेशात महाराजांच्या जयंतीचा उत्साह दिसतो. अमेरिकेतील सुप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर इथं छञपती फाउंडेशन या जागतिक संस्थेच्या माध्यमातून शिवजयंती साजरी होतेय. सलग दुसर्‍या वर्षी ही जयंती साजरी झाली. विशेष म्हणजे जर्मनी, इंग्लड,रशिया, चीन, जपान, साऊथ आफ्रिका, यासह अनेक युरोपिय आशियाई, आणि आफ्रिकन देशांमध्ये शिवाजी महाराजांच्या किर्तीचा नावाचा डंका वाजतोय.

मागील वर्षी पहिल्यांदा न्यूयार्क मधील जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर इंथ भारतीय तरुणानी सर्व प्रथम शिवजयंती समारोह साजरा करण्यास सुरूवात केली. आणि छञपतीची जगाला नव्याने ओळख करून देण्याच्या महाकार्यालाच यातून सुरूवात झाली. अनेक देशातील तरूणांनी या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन, यावर्षी जगातील एकूण 45 देशांमध्ये शिवजन्मोस्तव या वर्षापासून साजरा करायला सुरूवात झाली आहे.

छत्रपती फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात अमेरिकेतील अनेक भारतीय सहभागी झाले. या माध्यमातून, भारतियाना विदेशीभूमीवर संघठीत होण्यासाठी एक चांगलं माध्यम छञपती फाउंडेशनच्या रूपाने उपलब्ध झालं आहे. सर्वप्रथम गेल्या वर्ष 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करून फाउंडेशन च्या कार्याची सुरूवात झाली, त्यानंतर 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब अंबेडकर जयंती, त्या नंतर 31 मेला महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अमेरिकेत साजरी केली गेली. तसंच 12 जानेवारीला राजमाता जिज़ाऊ जन्म उत्सव ही सजरा केला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2016 06:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close