S M L

माणुसकीचा दुष्काळ, पारधी आहे म्हणून हंडाभर पाणी भरण्यास मनाई

Sachin Salve | Updated On: Feb 20, 2016 02:45 PM IST

माणुसकीचा दुष्काळ, पारधी आहे म्हणून हंडाभर पाणी भरण्यास मनाई

बीड - 20 फेब्रुवारी : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात दुष्काळापेक्षाही माणुसकीचा दुष्काळ पाहण्यास मिळत आहे. गुन्हेगाराचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील महिलांना विहीर,आडावर पाणी भरण्यास मनाई केली जात आहे.

मराठवाड्यातील ग्रामस्थांचा पाण्यासाठी आता संघर्ष सुरू झालाय महिलांचा पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुरू आहे. सर्वसामान्य महिलांसाठी हंडाभर पाण्यासाठी दिवसभर वनवन भटकंती सुरू आहे. त्यांना पाणी तरी मिळतंय..मात्र द-याखोर्‍यात गावकुसाबाहेर राहणा-या पारधी समाजाच्या महिलांना तर हंडाभर पाण्यासाठी शिव्या खाव्या लागतात. अपमान सहन करावा लागतो. पारधी समाजाला आपण आजही कुठंतरी गुन्हेगार समाज मानतो. त्यामुळंच त्यांना आजही विहीर आडावर कुणीही पाणी भरू देत नाही. त्यामुळे पारधी समाजाच्या महिलांची पाण्यासाठी वेगळीच फरफट सुरू आहे.

बीड जिल्ह्यात किती दिवसांनी येतं पाणी?

- बीड - 5 दिवसांनी

- अंबाजोगाई - 21 दिवसांनी

- परळी - 4 दिवसांनी

- धारूर - 7 दिवसांनी

- गेवराई - 5 दिवसांनी एकदा

- माजलगाव- 7 दिवसांनी

- आष्टी - 8 दिवसांनी

- पाटोदा - 10 दिवसांनी

- शिरूर - 10 दिवसांनी

- केज - 8 दिवसांनी

- वडवली - 10 दिवसांनी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2016 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close