S M L

स्मरण सावित्रीबाईंचे...

10 फेब्रुवारी आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन. तत्कालीन समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी स्त्रीशिक्षणाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. सावित्रीबाईंनी स्त्री- शिक्षणासह, स्त्री-पुरुष समानता आणि जातनिर्मूलनाचे मोठे कार्य केले. सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यातील नायगांवमध्ये 1831मध्ये त्यांचा जन्म झाला. नायगाव येथील जन्मघरातच त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. सावित्रीबाईंच्या वापरातील वस्तूंसोबतच दुर्मिळ छायाचित्रेही इथे ठेवण्यात आली आहेत. सावित्रीबाई या भारतातील पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिकाही. महात्मा फुलेंशी लग्न झाल्यानंतर समाजाच्या विरोधात जाऊन 1848 मध्ये त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली.त्यांनी स्वत:च्या घरातच बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले. महात्मा फुलेंच्या जोडीने त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. बहुजनांचे शिक्षण आणि सत्यशोधक विवाहाच्या चळवळीतही त्या पुढे होत्या. जोतिबा गेल्यानंतरही सावित्रीबाईंनी त्यांचे कार्य पुढे नेले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2010 02:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2010 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close