S M L

जमिनीच्या वादातून चिमुरड्याला टॅक्टरखाली चिरडलं, आरोपी गजाआड

Sachin Salve | Updated On: Feb 22, 2016 06:14 PM IST

जमिनीच्या वादातून चिमुरड्याला टॅक्टरखाली चिरडलं, आरोपी गजाआड

बारामती - 22 फेब्रुवारी : जमिनीच्या वादातून एका सात वर्षांच्या चिमुरड्याला टॅक्टरखाली चिरडण्याची धक्कादायक घटना बारामतीजवळील पिंपळी गावात घडलीये. ओम सागर खिल्लारे असं या मृत चिमुरड्याचं नाव आहे. या प्रकरणी आरोपी बापूराव देवकातेला पोलिसांनी अटक केलंय.

ओम खिल्लारे हा सात वर्षांचा चिमुरडा घराजवळ कुल्फी खात असताना शेजारी राहणारे ट्रॅक्टरचालक बापुराव देवकाते यानं समोरूनच ट्रॅक्टरअंगावर घातला. यात ओम जागीच ठार झाला. त्यानंतप बापूराव देवकाते पळून गेला. बापूराव देवकाते आणि सागर खिल्लारे हे शेजारी आहेत. पण देवकाते यांना खिल्लारे यांची 3 गुंठा जमीन हवी होती. हे खिल्लारे यांना मान्य नव्हतं. याचाच राग मनात धरून देवकाते यांने हे कृत्य केलं. याबबात सागर खिल्लारे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी देवकातेला बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाचील यांनी तत्काळ अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2016 06:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close