S M L

चोरीच्या संशयावरुन मायलेकीला विवस्त्र करून मारहाण

Sachin Salve | Updated On: Feb 22, 2016 08:36 PM IST

चोरीच्या संशयावरुन मायलेकीला विवस्त्र करून मारहाण

पुणे - 22 फेब्रुवारी : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीये. चोरीच्या संशयावरून दलित महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून भर रस्त्यात मारहाण करण्यात आलीये. या प्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून आरोपीना अद्याप अटक झाली नाही.

इंदापूर तालुक्यात अंथुर्ने गावातील पीडित महिला इंदापूर आठवडा बाजारमध्ये भाजीपाला विक्री करून घरी जाण्यासाठी ऑटो रिक्षा मधून जात आसताना याच ऑटो रिक्षामध्ये असणार्‍या एका महिले बरोबर तिची बसण्याच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर ही महिला ती रिक्षा सोडून दुसर्‍या रिक्षाने घरी जात होती. अचानक बारामती रोडवरील निमगाव केतकीजवळ बाचाबाची झालेल्या महिलेनं मायलेकी बसलेली ऑटो रिक्षा आडवून तिच्या सोबत असणार्‍या 14 वर्षांच्या मुलीला रिक्षातून बाहेर ओढून मारहाण केली. सोन्याचे दागिने चोरल्याच्या संशयावरून ही मारहाण करण्यात आली. हा प्रकार समजल्या नंतर अनेक सामाजिक संघटनांनी निषेध केलाय. याप्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून आरोपींना तत्काळ अटक करणार आसल्याचं पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2016 08:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close