S M L

सेनेचे युवराज आयत्या बीळावर नागोबा, श्रेयवादामुळे शेलार भडकले

Sachin Salve | Updated On: Feb 23, 2016 04:19 PM IST

सेनेचे युवराज आयत्या बीळावर नागोबा, श्रेयवादामुळे शेलार भडकले

मुंबई - 23 फेब्रुवारी : भाजपचे मुंबईचे प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना आयत्या बिळावर असा उल्लेख करुन नव्या वादाला तोंड फोडलंय. आदित्य ठाकरे यांनी न केलेल्या कामाची पोस्टर्सच लावली आहेत. त्यामुळे ते आयत्या बिळावर प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेलारांनी ट्विटच्या माध्यमातून केलाय.

इतकंच नाहीतर त्यांनी केलेल्या पाठपुरवाची सर्व कागदपत्रच त्यांनी ट्विटरवर टाकली आहेत. वांद्र्यातल्या प्रोमोनेडवर तिरंगा लावणं असो, की फुटबॉलसाठी मैदान मिळवणं असो किंवा थिम पार्क असो या सर्व गोष्टींसाठी अनामत रक्कम भरणं असो या सर्व गोष्टी मी केल्या आहेत आणि त्याचं श्रेय मात्र आदित्य ठाकरे घेत आहेत असा स्पष्ट आरोप शेलारांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनीही ट्विटकरुन या सर्व गोष्टींचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न तर केलाच आहे. शिवाय शेलारांच्या मतदार संघात पोस्टरबाजी ही केलीय. त्यामुळे आशिष शेलारांनी इतक्या शेलक्या भाषेत आपल्या मित्र पक्षाच्या युवराजांना आयत्या बिळावर 'नागोबा' म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2016 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close