S M L

माजी आमदार पाशा पटेल यांचं साहित्य आमदार निवासमधून बाहेर

Sachin Salve | Updated On: Feb 23, 2016 07:17 PM IST

माजी आमदार पाशा पटेल यांचं साहित्य आमदार निवासमधून बाहेर

मुंबई - 23 फेब्रुवारी : भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांचं साहित्य आमदार निवासातून बाहेर काढण्यात आलं. पाशा पटेल हे भाजपचे माजी आमदार आहेत. मनोरा आमदार निवासमधील रूम बी-92 मधून पटेल यांचं साहित्य काढलंय.

रूम बी-92 ही महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावावर होती. पाशा पटेल यांचा कार्यकाळ 2012 मध्येच संपला. तरीही 3 वर्ष रूम त्यांच्याच ताब्यात होती.

पाशा पटेल यांना रूम खाली करण्याची वारंवार सूचना देऊनही रूम खाली न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. पाशा पटेल यांचं साहित्य सील करुन जमा करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2016 07:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close