S M L

दुष्काळासोबत दोन हात करताना करिअर दावणीला, अनेक विद्यार्थी परिक्षेला गैरहजर

Sachin Salve | Updated On: Feb 23, 2016 09:24 PM IST

दुष्काळासोबत दोन हात करताना करिअर दावणीला, अनेक विद्यार्थी परिक्षेला गैरहजर

बीड - 23 फेब्रुवारी : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत चाललीये. जिल्ह्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत या परिक्षेवरही दुष्काळाचं सावट आहे. काही ठिकाणी रोजंदारीसाठी तर काही ठिकाणी पाण्यासाठी बारावीच्या परिक्षेकडे विद्यार्थ्यांनी चक्क पाठ फिरवली आहे.

जिल्ह्यात यंदा 35 हजार 24 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसलेत मात्र त्यातील अनेक विद्यार्थी परीक्षा द्यायला टाळाटाळ करतायत. गावात पडलेला भीषण दुष्काळ, त्यामुळे अन्नपाण्यासाठी कुटुंबाची होत असलेली वणवण आणि त्यामुळे परिस्थितीशी दोन हात करायला घराबाहेर पडणं क्रमप्राप्त ठरलंय. अशात प्रत्येक पेपरला जवळपास हजार विद्यार्थी गैरहजर रहात असल्याचं चित्र पहायला मिळतंय.

जिल्ह्यात या वर्षी 35024 विद्यार्थी हे बारावीच्या परिक्षेला बसले आहेत. परंतु, प्रत्यक्षात परीक्षेस मात्र मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्याची गैरहजरी आहे, आणि ह्या गैरहजेरीच कारण आहे दुष्काळ... आश्चर्य वाटल ना...पण हे खरं आहे. आज ग्रामाण भागात हाताला काम नाही आणि पिण्यासाठी पाणी नाही त्यामुळे कामाच्या शोधात महानगराकडे कुटुंब हे स्थलांतरीत होत आहेत. यात या कुटुंबातील मुलं देखील जात आहेत मग परीक्षा असो की काहीही रोजगार सोडूण कशाला यायचं...असा विचार आता या भागातील विद्यार्थी करत आहेत.

गैरहजर विद्यार्थी संख्या

विषय                 हजर          गैरहजर

* इंग्रजी -        33664       - 1360

* मराठी -       15773             840

* हिंदी -           12312            626

अशी जिल्ह्यात दुष्काळाने स्थिती झाली असून करिअर पेक्षा आजचा दिवस काढणे हा महत्वाचा ठरत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2016 09:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close