S M L

नेपाळमध्ये प्रवासी विमानाला अपघात

Samruddha Bhambure | Updated On: Feb 24, 2016 12:08 PM IST

नेपाळमध्ये प्रवासी विमानाला अपघात

 

नेपाळ - 24 फेब्रुवारी : नेपाळमध्ये तारा एअरलाईन्सच्या प्रवासी विमानाला आज (बुधवारी) सकाळी अपघात झाला आहे. या दुर्घटनेत विमानातून प्रवास करणारे तीन क्रु मेंबरसह 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप मृतांची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तारा एअरलाईन्सच्या प्रवासी विमानाला पोखराहून जोमखोमला जाताना हा अपघात घडला. पोखरा विमानतळावरून सकाळी 7.50 वाजता विमानाने उड्डाण केले. काही वेळातच या विमानाचा संपर्क तुटला आणि ते बेपत्ता झालं. 8.50नंतर विमानासोबत संपर्क पूर्णपणे तुटला. त्यानंतर म्यागदी जिल्हय़ातील नागदा गावात विमान कोसळल्याची माहिती विमानतळ अधिकार्‍यांनी सांगितलं. पर्वतरांगांमध्ये विमानाचे अवशेष सापडले असून, बचाव पथक घटनास्थळी पोचले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2016 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close