S M L

भुजबळ आणखी गोत्यात, एसीबीकडून चार्जशीट दाखल

Sachin Salve | Updated On: Feb 24, 2016 05:52 PM IST

भुजबळ आणखी गोत्यात, एसीबीकडून चार्जशीट दाखल

नाशिक - 24 फेब्रुवारी :: महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात आज (बुधवारी) मुंबई सत्र न्यायालयात एसीबीकडून चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.

भुजबळ यांच्यासहीत त्यांचा मुलगा आमदार पंकज भुजबळ, पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासहित 17 जणांना दोषी पकडण्यात आलंय. भुजबळ कुंटुंबीयांच्या विरोधातील ही चार्जशीट तब्बल 20 हजार पानांची आहे.

महाराष्ट्र सदन बांधकामात गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.एकूणच येणार्‍या काळात भुजबळांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

चार्जशीटमधील आरोपींची नावं

- छगन भुजबळ - तत्कालीन मंत्री

- पंकज भुजबळ- भुजबळांचा मुलगा

- समीर भुजबळ- भुजबळांचा पुतण्या

- माणिकलाल शहा - तत्कालीन मुख्य अभियंता

- दीपक देशपांडे - तत्कालीन सचिव, बांधकाम विभाग

- अरुण देवधर - तत्कालीन अधीक्षक अभियंता

- देवदत्त मराठे- तत्कालीन सचिव, बांधकाम विभाग

- बिपीन संखे - मुख्य वास्तुशास्त्रज्ञ

- अनिलकुमार गायकवाड - तत्कालीन कार्यकारी अभियंता

- कृष्णा चमणकर - विकासक

- प्रवीणा चमणकर - विकासक

- प्रणिता चमणकर - विकासक

- प्रसन्ना चमणकर - वास्तुशास्त्रज्ञ

- तन्वीर इस्माईल शेख - संचालक निश इन्फ्रा प्रा.लि.कंपनी

- इरम तन्वीर शेख

- संजय दिवाकर जोशी

- गीता संजय जोशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2016 05:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close