S M L

पालघरमध्ये जि.प.शाळेतील 247 विद्यार्थ्यांना विषबाधा, 17 जणांची प्रकृती गंभीर

Sachin Salve | Updated On: Feb 25, 2016 10:21 PM IST

पालघरमध्ये जि.प.शाळेतील 247 विद्यार्थ्यांना विषबाधा, 17 जणांची प्रकृती गंभीर

palghar32पालघर - 25 फेबु्रवारी : विक्रमगड कासा इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या 247 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. यात 17 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. जेवणातून मुलांना विषबाधा झाल्याने त्यांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पालघर जिल्हातील विक्रमगड़ तालुक्यातील कासा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील जवळपास 247 विद्यार्थ्यांना मध्याण

भोजनातून विषबाधा झाली आहे. यापैकी सतरा विद्यार्थ्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे समजते. दुपारी इस्कॉन या संस्थेमार्फ़त पुरविण्यात येणारी खिचड़ी खाल्याने विद्यार्थ्यांना मळमळ,चक्कर,उल्ट्या होऊ लागल्यावर शिक्षकांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांना जवळच्या तलवाड़ा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपजिल्ह्यारुग्णालय कासा इथं विद्यार्थ्याना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2016 10:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close