S M L

शिवसेनेच्या शाखाप्रमुखाची महिला पोलिसाला मारहाण

Samruddha Bhambure | Updated On: Feb 26, 2016 09:32 AM IST

शिवसेनेच्या शाखाप्रमुखाची महिला पोलिसाला मारहाण

ठाणे - 25 फेब्रुवारी : कार चालवत असताना मोबाइलवर बोलत असल्याचं दिसल्यानंतर वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलने त्याची गाडी रोखली. मात्र, चुकीची माफी मागण्याऐवजी या वाहनचालकाने थेट त्या महिला कॉन्स्टेबलला भर चौकात चक्क मारहाण सुरू केली. तिच्या नाकातून रक्त ओघळू लागल्यानंतर एक वकील तिच्या मदतीसाठी धावला. त्यानंतर त्या वाहनचालकाची वरात पोलिस स्टेशनला पोहचली.

कर्तव्य बजावणार्‍या महिला पोलिसावर हात उचलत 'मर्दुमकी' गाजवणार्‍या या 'महान' शिवसैनिकाचं नाव शशिकांत कालगुडे (44) असून तो शिवसेनेचा धर्मवीर नगरातील शाखाप्रमुख आहे. कालगुडेला पोलिसांनी अटक केली असून कोर्टाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

झालं असं की, गुरुवारी सकाळी नितीन कंपनी जंक्शन इथून कालगुडे आपल्या स्कॉर्पिओ गाडीने जात होता. गाडी चालवत असताना मोबाइलवर बोलणार्‍या शशिकांत याला नितीन कंपनी जंक्शन इथे ड्यूटीवर असलेल्या एका महिला वाहतूक पोलिसानं त्याला हटकलं. त्यामुळे सिग्नलवर वाहनांचा खोळंबा होत असल्याचं शशिकांतच्या निदर्शनास आणून देताच रागाचा पारा चढल्यानं त्याने गाडीतून उतरत चक्क पोलीस महिलेला भर चौकात शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, महिला पोलिस शिपायाच्या नाकातोंडातून रक्तस्राव होत असतानाही तिने धीर एकवटत आरोपी शशिकांत विरोधात पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. नौपाडा पोलिसांनीही तात्काळ कारवाईचा बडगा उगारत आरोपी शशिकांतच्या गुन्हा नोंदवला. कोर्टाने आरोपी शशिकांतला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2016 08:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close