S M L

शिर्डीच्या साई बाबाचं दर्शन महागलं, व्हीआयपी पासमध्ये 100 रुपयांची वाढ

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2016 12:11 AM IST

sai babaशिर्डी-26 फेब्रुवारी : ज्या साईबाबांनी कधी कुणात भेदभाव केला नाही 'सबका मालिक एक' चा महामंत्र ज्यांनी जगाला दिला त्यांच्याच मंदिरात मात्र पदोपदी गरीब श्रीमंत सामान्य व्हीआयपी अशी दरी वाढताना दिसते आहे. शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मार्च महिन्यापासून व्हीआयपी दर्शन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय संस्थान प्रशासनाने घेतलाय. व्हीआयपी पासच्या शुल्कात 100 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.

यापूर्वी व्हीआयपी रांगेतून दर्शन घेण्यासाठी प्रती माणसी 100 रूपये मोजावे लागत होते. मात्र, आता त्यासाठी 200 रूपये मोजावे लागतील. तर काकड आरतीसाठीही 500 रूपयांऐवजी प्रति 600 रूपये मोजावे लागतील. व्हीआयपी दर्शनासोबतच धुपारती आणि शेजारतीचं शुल्कही 300 रुपयांवरून 400 रुपये करण्यात आला आहे. साई भक्तांच्या सोयीसाठी हे पासेस जनसंपर्क कार्यालयासोबतच यापुढे भक्तनिवासातही उपलब्ध होणार आहेत असा निर्णय शिर्डी संस्थान प्रशासनाने घेतला आहे.

साईबाबानी सबका मालिक एक चा महामंत्र जगाला दिला त्यांच्याच मादिरात मात्र गरिब श्रीमंत असा भेंदभाव केला जात असल्याच दिसत आहे. साईबाबा संस्थानकडे आज 1500 कोटीहुन अधिक ठेवी असून शिर्डी ची परिस्थिती आहेच तशी आहे. आणि साईबाबांनी जो महामंत्र जगाला दिला त्याच अनुकरण करावं हीच सर्व सामान्य जनतेची अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2016 07:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close