S M L

मालगाडीचे 4 डबे घसरल्याने नागपूर-मुंबई वाहतूक ठप्प

Samruddha Bhambure | Updated On: Feb 27, 2016 03:40 PM IST

मालगाडीचे 4 डबे घसरल्याने नागपूर-मुंबई वाहतूक ठप्प

जळगाव : भुसावळ यार्डात मालगाडीचे 4 डबे रुळांवरून घसरून भुसावळ - नागपूर रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नागपूरहून मुंबईला येणार्‍या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून त्या अनिश्चित काळासाठी विलंबाने धावत आहेत.

दरम्यान, अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे डबे रुळांवरून हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी वाहतूक पूर्वपदावर आणखी 3 ते 4 तास लागतील. दुपारी 12 पर्यंत वाहतूक सुरळीत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2016 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close