S M L

विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 27, 2016 03:40 PM IST

विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी

वर्धा - 27 फेब्रुवारी : वर्धा जिल्ह्यातील काही भागत काल (शुक्रवारी) रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वर्धाकरांची चांगलीच तारांबळ उडाली, मात्र अनेक ठिकाणी पिकांचंही नुकसान झालं आहे.

विदर्भात यवतमाळ, गोंदिया, भंडारा, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील कोराडी देवलापार इथे पावसासह गारपीट झाल्याने रब्बी पिकाचे नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी बोराच्या आकाराच्या गारा पडल्याने पिकांचं नुकसान झालं आहे.गारपीट आणि अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी संत्र्याची झाडं, तसंच भाजीपाल्याची पीकंही खराब झाले आहेत. एवढचं नाही तर या अवकाळी पावसाचा गहू, हरभरा, पिकालाही फटका बसला आहे.

सुर्याची किरण सरळ पडत असल्यामुळे उष्णता वाढली आहे. त्यामुळे बाष्पिभवनातून ढगत तयार झाले. येत्या काही दिवसात आणखी आवकाळी पावसाची आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2016 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close