S M L

मुंबईत महालक्ष्मी मंदिर परिसरात इमारतीला आग

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2016 08:44 PM IST

मुंबईत महालक्ष्मी मंदिर परिसरात इमारतीला आग

मुंबई - 27 फेब्रुवारी : महालक्ष्मी मंदिर परिसरातल्या तिरुपती अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. या आगीत एक व्यक्ती  जखमी झालाय. आता ही आग आटोक्यात आणण्यात आलीये.

आज दुपारी एसी काॅम्प्रेसरमध्ये शाॅर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. अग्नीशमन दलाच्या आठ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. धुरामुळे त्रास झाल्यामुळे एक जण किरकोळ जखमी झाला. जखमीवर नजीक हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सुदैवाने वेळीच इमारत खाली केल्यामुळे पुढील दुर्घटना टळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2016 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close