S M L

माई 2016 पुरस्कारात 'किल्ला' ठरला सर्वोत्त्कृष्ट सिनेमा

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2016 08:07 PM IST

माई 2016 पुरस्कारात 'किल्ला' ठरला सर्वोत्त्कृष्ट सिनेमा

सिडनी - 27 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियामध्ये माई 2016 पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात किल्ला सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तसंच सर्वोत्त्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही किल्ला सिनेमाने पटकावला.

या पुरस्कार सोहळ्यात प्रकाशबाबा आमटे सिनेमातल्या 'तू बुद्धी दे' या गाण्याला सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार मिळाला. हे गीत गुरु ठाकूर यांनी लिहिलंय. तर या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार शंकर महादेवन यांना 'तू ही रे माझा मितवा' गाण्यासाठी देण्यात आला आहे. तसंच 'तू बुद्धी दे' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून विभावरी आपटे हिली पुरस्कार देण्यात आलाय. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीताचा पुरस्कार देबार्पितो साहा यांना 'हॅपी जर्नी' सिनेमासाठी देण्यात आलाय. तर सर्वोत्कृष्ट संगीतासाठी 'एक तारा' सिनेमासाठी अवधूत गुप्तेला पुरस्कृत केलं गेलंय.

माई 2016 पुरस्कार सोहळा

- सर्वोत्कृष्ट चित्रपट - किल्ला

- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अविनाश अरुण - किल्ला

- सर्वोत्कृष्ट संवाद - उपेंद्र शिधये - किल्ला

- सर्वोत्कृष्ट कथा - मधुगंधा कुलकर्णी- एलिझाबेथ एकादशी

- सर्वोत्कृष्ट पटकथा - आदिती मोघे - कॉफी आणि बरंच काही

'तू बुद्धी दे' सर्वोत्कृष्ट गीत

शंकर महादेवन सर्वोत्कृष्ट गायक - 'तू ही रे माझा मितवा' गाण्यासाठी पुरस्कार

विभावरी आपटे सर्वोत्कृष्ट गायिका - 'तू बुद्धी दे' गाण्यासाठी पुरस्कार

'हॅपी जर्नी' सिनेमा सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, देबार्पितो साहा यांना पुरस्कार

अवधूत गुप्तेला सर्वोत्कृष्ट संगीतासाठी पुरस्कार

'एक तारा' सिनेमासाठी मिळाला पुरस्कार

सर्वोत्कृष्ट कथा-मधुगंधा कुलकर्णी

'एलिझाबेथ एकादशी'साठी पुरस्कार

सर्वोत्कृष्ट पटकथा-आदिती मोघे

'कॉफी आणि बरंच काही'साठी पुरस्कार

सर्वोत्कृष्ट संवाद-उपेंद्र शिधये

'किल्ला' सिनेमासाठी पुरस्कार

- शाहीर दादा कोंडके पुरस्कार - चला हवा येऊ द्या टीम

- परीक्षक पसंती - नागरिक

- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - सचित पाटील - क्लासमेट्स

- सर्वोत्कृष्ट सहा. अभिनेत्री - स्मिता तांबे - कैंडल मार्च

- सर्वोत्कृष्ट पुनरुज्जीवित नाट्यकृती - वाडा चिरेबंदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2016 08:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close