S M L

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर प्राणघातक हल्ला

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2016 02:12 PM IST

 भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर प्राणघातक हल्ला

बीड -28 फेब्रुवारी : लातूर आणि ठाण्यामध्ये पोलिसांवर हल्ल्याच्या घटना ताज्या असतांना बीडमध्ये पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला झालाय. भांडण सोडवण्यासाठी पोलीस नाईक कैलास ठोंबरे गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.

पोलीस नाईक कैलास ठोंबरे हे रात्री ड्युटी संपवून घरी जात होते. तेव्हा नगर रोडवर दोन गटांमध्ये भांडण सुरू होतं. ते भांडण सोडवण्यासाठी ठोंबरे गेले तेव्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्या डोक्यामध्ये बीअरची बाटली फोडली. त्यात ते गंभीर झाले. पुढच्या उपचारांसाठी त्यांना जालन्याला हलवण्यात आलंय. विशेष म्हणजे मारहाण करणार्‍यांमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा सहभाग असल्याची माहिती आहे. पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी गंभीर दखल घेतली आणि रात्रीच संशयित गुन्हेगारांचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना दिसून आली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचा नगरसेवक शेख मुस्तफा, गणेश जाधव, यांच्यासह इतर 4-5 जणं दिसत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2016 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close