S M L

अवकाळी पावसाचा फटका, लाखो रुपयांचं धान्य पाण्यात

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2016 02:31 PM IST

अवकाळी पावसाचा फटका, लाखो रुपयांचं धान्य पाण्यात

भंडारा -28 फेब्रुवारी : भंडार्‍यात अचानक आलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. सगळ्यात जास्त नुकसान झालं ते बाजार समितीमध्ये आणलेल्या धानाचं..विक्रीसाठी आणलेलं धान्य पाण्यात भिजलंय. कमीत कमी 1000 पोते धान पाण्यात भिजल्याने 20 लाख रुपयांचा शेतकर्‍यांचं नुकसान झालं आहे.

भंडारा जिल्हा हा धानाचं कोठार म्हणून ओळखला जातोय. त्यामुळे धानाची कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरमध्ये आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं. कारण या बाजार समितीमध्ये सुविधांचा अभाव आहे. या बाजार समितीमध्ये पुरेसं गोडाऊन नाही. या बाजार समितीमध्ये कोट्यवधींचं धान विक्रीसाठी येत असतं. मात्र यातल्या धानाचा मोठा भाग हा उघड्यावरच ठेवलेलाच असतो. शनिवारी आलेल्या पावसामुळे उघड्यावरचं धान भिजून गेलंय. हे भिजलेलं धान आता व्यापारी किंवा ग्राहक विकत घेणार नसल्यानं शेतकर्‍यांनी ते धान घरी परत नेलं. त्यामुळे आता लागवडीला केलेला खर्चही शेतकर्‍यांचा निघणार नाहीय. त्यामुळे शेतकर्‍यांचं अजून किती नुकसान झाल्यानंतर बाजार समितीला जाग येणार आणि शेतकर्‍यांसाठी मोठ्या शेडची व्यवस्था कधी करणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2016 02:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close