S M L

एसटी कर्मचार्‍यांसाठी लवकरच कॅशलेस मेडिकल सेवा -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2016 02:50 PM IST

एसटी कर्मचार्‍यांसाठी लवकरच कॅशलेस मेडिकल सेवा -मुख्यमंत्री

नागपूर - 28 फेब्रुवारी : एसटी कर्मचार्‍यांना कॅशलेस मेडिकल सेवा लवकरच आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये तसंच एस टी कर्मचार्‍यांच्या मागण्या योग्यच असल्याचंही फडणवीस यांनी मान्य केलं. ते महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलत होते.

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. या अधिवेशनाला राज्यभरातील जवळपास 30 हजार एसटी कर्मचारी उपस्थित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाला उपस्थित होते. आम्ही पाच वर्षे काम केलं नाही तर लोक आम्हाला घरी बसवतात. मात्र, राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांचं तसं नाही. सेवा चांगली दिली नाही तर लोक विरोध करतील आक्रमक होतील. म्हणून एसटी कुणाच्याही चुकीमुळे तोट्यात चालणार नाही याची काळजी घ्यावी असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सराकारच्या पहिल्या पाच महामंडळापैकी एसटीला सोयी देण्यात येणार आहेत. तर एसटी कर्मचार्‍यांना कॅशलेस मेडिकल सेवा देण्याचा निर्णय लवकर घेणाार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2016 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close