S M L

आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव अटळ, पवारांचं भाकित

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2016 09:29 PM IST

sharadpawar-kc8F--621x414@LiveMint28 फेब्रुवारी : भाजप फक्त राष्ट्रभक्त आणि बाकी सगळे राष्ट्रविरोधी आहेत असं भासवतं आहे. त्यामुळे संघर्ष होईल हे अटळ आहे. जेएनयू प्रकरण हे एक राजकीय षड्‌यंत्र आहे. देशात वेगळं वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसंच आगामी केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव अटळ आहे असं भाकितही पवारांनी व्यक्त केलं.

शनिवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची शरद पवार यांनी बैठक घेतली. यावेळी शरद पवारांनी जेएनयू मुद्यावर भाजपवर टीकास्त्र सोडलं. जेएनयूमध्ये संघाची पुरस्कृत अभाविप संघटनेचा पराभव झाला म्हणून हे राजकारण पेटवलं गेलं. आणि त्यांचे मंत्री संसदेत पाठीशी उभे राहिले हा दुदैर्वी प्रकार आहे. भाजपने राष्ट्रभक्त आणि राष्ट्रद्रोही सर्टिफिकेट वाटू नये असा सल्लावजा टोलाही पवारांनी लगावला. तसंच सध्या राज्यात सूडाचं राजकारण सुरू आहे. सूरज परमार प्रकरणी वेगळ्या विचारांच्या नेत्यांना संपवण्याचं काम सुरू असल्याचा थेट आरोप शरद पवार यांनी केला आहे. परमार प्रकरणात आमचे कार्यकर्ते दोषी असेल त्याना मी पाठीशी घालणार नाही. परमार यांच्या चुकीच्या गोष्टीवर आमच्या नगरसेवकांनी बोट ठेवलं तर त्यांना तुरुंगात डांबल जातंय अशा थेट आरोप पवारांनी केला आहे. तसंच देशात भाजपची प्रतिमा ढासळली आहे. दिल्ली आणि बिहारमध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. आता केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होईल असं भाकित पवारांनी व्यक्त केलं. तसंच पराभव दिसत असल्यामुळे भाजपकडून हिंदुत्वाचं राजकारण केलं जात आहे अशी टीकाही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2016 09:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close