S M L

मारहाण करणारे शिवसैनिक दिसता मदत करणारे दिसत नाही का ?-उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Mar 1, 2016 09:36 AM IST

मारहाण करणारे शिवसैनिक दिसता मदत करणारे दिसत नाही का ?-उद्धव ठाकरे

मुंबई -01 मार्च : वडापावसाठी शिवसैनिकांनी दुकानदाराला मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. पण, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र मीडियावरच नाराजी व्यक्त केली. ठाण्यात पोलिसाला मारहाण प्रकरणी मीडियाने शिवसैनिक शोधून काढला असा आरोपच त्यांनी केला. मारहाण करणारे शिवसैनिक दिसता पण, मदत करणारे शिवसैनिक दिसत नाही अशी खंतच उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

ठाण्यामध्ये एका वाहनचालकाने गाडी अडवली म्हणून महिला पोलिसाला मारहाण केली. मारहाण करणार्‍या वाहनचालकाने आपल्या गाडीवर शिवसेनेचं स्टीकर आणि झेंडा लावला होता. पण, शिवसेनेनं तो शिवसैनिक नाही असं सांगून हात झटकले होते. ही घटना ताजी असतांनाच 100 वडापाव मोफत दिले नाहीत म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यानं एका दुकानदाराला मारहाण केल्याची घटना उजेडात आली.

मुंबईच्या विलेपार्ले पश्चिममध्ये युवासेनेचा पदाधिकारी सुनील महाडीकनं तृप्ती फरसाण मार्टचा दुकानाचा मॅनेजर चेतन पटेल यांना लाकडी बांबूनी मारहाण केलीय. विलेपार्ले पश्चिमच्या मैदानात बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं 'साहेब क्रिकेट चषकाचे' सामने भरवण्यात आले होते. या सामन्यांसाठी तृप्ती फरसाण मार्टच्या मालकानं 100 वडापाव मोफत दिले नाही, म्हणून सुनिल महाडीकने मॅनेजरला मारहाण केलीय. तृप्ती फरसाण मार्टचे मॅनेजर यांना कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुनील महाडीकवर जुहू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून गुन्ह्याची नोंद करत पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

शिवसैनिकांनी मारहाण केल्याची ही पहिलीच घटना नाही या आधीही अनेक वेळा या ना त्या कारणामुळे शिवसैनिकांनी महिला दुकानदारापासून ते आरटीआय कार्यकर्त्यांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, उद्धव ठाकरे यांनी मीडियावर नाराजी व्यक्त केलीये. मारहाण करणार शिवसैनिक दिसतो मात्र तुम्हा मीडियाला रमेश वळुज दिसला नाही. ज्याने 3 मुलींचे जिव वाचविले या गोष्टीचा मला संताप आहे अशी खंतच उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

शिवसैनिकांची गुंडगिरी

- फेब्रुवारी 2016 - मुंबई - वडापाव दुकानदाराला शिवसैनिकाची मारहाण

- फेब्रुवारी 2016 - ठाणे - शिवसेना कार्यकर्त्याची महिला पोलिसाला मारहाण

ऑक्टोबर 2015- मुंबई- शिवसैनिकांनी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकली

- खासदार चंद्रकांत खैरै यांची तहसिलदारांना शिवीगाळ

जून 2010 - औरंगाबाद - छायाचित्रकाराला शिवसैनिकांची मारहाण

मे 2015 - लोणावळा - शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांची व्यावसायिक सुनिल दरेकर यांना मारहाण

ऑक्टोबर 2015 - मुंबईत शिवसैनिकांची तरुणाला नग्न करुन मारहाण

नोव्हेंबर 2015 - औरंगाबाद - RTI कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना शिवसैनिकांची मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2016 09:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close