S M L

अवकाळी-गारपिटीने बळीराजा हवालदिल, शिर्डीत वीज पडून एकाचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Mar 1, 2016 10:36 AM IST

अवकाळी-गारपिटीने बळीराजा हवालदिल, शिर्डीत वीज पडून एकाचा मृत्यू

बीड - 01 मार्च : गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात झालेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे आधीच दुष्काळाने होरपळलेला बळीराजा हवालदिल झालाय. बीड, परभणी, वाशिम, बुलडाणा आणि खान्देशात धुळ्यातही अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. पुढील तीन ते चार दिवस पावसाचा हा अवकाळी खेळ कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर शिर्डीमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. अकोले तालुक्यात मुसळधार पावसामुळे वीज पडून शाम वाकचौरे हा तरूणाला आपला जीव गमवावा लागलाय.

garpit3जनावरं उघड्यावर

बीड जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या चक्रीवादळ आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका चारा छावाण्यांना बसलाय. छावण्यांवरील कापडं, पत्रे उडून गेलेत तर रोवलेले खांब उखडले गेल्यानं विद्युत पुरवठाही खंडीत झाला. मैंदा,पोखरी, पुसरा,पालवनमध्ये जनावरांच्या डोक्यावरील छत उडून गेल्यानं जनावर उन्हात तळपू लागली आहेत. छावण्यांबरोबरच जिल्ह्यात गहू, आंबा, द्राक्ष यालाही मोठा फटका बसला आहे

वाशिममध्ये पिकांचं नुकसान

विदर्भात पावसाबरोबरच झालेल्या गारपिटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी कारंजा मंगरूळपीर तालुक्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊसासह गारपीट झाली. यात संत्रा, गहू, चणा या सह भाजीपाला पिकाचे मोठं नुकसान झालं.

बुलडाण्याला गारपिटीने झोडपले

बुलडाणा जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपून काढलंय. जिल्ह्यातल्या शेगाव, जळगाव-जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मोताळा या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. तर संग्रामपूर आणि मातोळा तालुक्यात गारपीट झाली. तर काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातल्या काही भागात वीजपुरवठाही खंडीत होता. अचानक आलेल्या या पावसाने शेतकर्‍यांचं मोठं नुकसान केलाय. काही शेतकर्‍यांच्या फळबागा उद्‌ध्वस्त झाल्यात. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. जिल्हा अगोदरच दुष्काळाने होरपळत आहेत. शेतकर्‍याच्या तोंडात आलेला घास या अवकाळी पावसाने हिराऊन घेतला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी रात्री पावसाने हजेरी लावली तर या पावसाने अनेकांना आता चिंतेत टाकले आहे.

rain31परभणीत अवकाळी पाऊस

परभणी शहरासह जिल्ह्यातील मानवत,पाथरी तालुक्यात तब्बल 1 तास वादळी वारे,विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला यामुळे 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर जाणवणार्‍या उकाड्यापासून काहीसा दिलासा परभणीकरांना मिळाला असला तरीही ऐन दुष्काळात उरला सुरलेला चारा मात्र काही प्रमाणात या पावसामुळे खराब झाला.

धुळ्यात हाहाकार

धुळे जिल्ह्यात वादळी वार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसानं चांगलच हाहाकार माजवलाय. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबऴ उडलीये. वादळी वार्‍यासह पाऊस सुरू होताच शहराचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. अनेक झाडं या वादळामुळे कोलमडून पडली, तर काही घरांचे आणि दुकानदारांचेही या अवकाळी पावसाने नुकसान केले. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील काढणीला आलेल्या गहू , हरभरा, कांदा फळबागांमध्ये डाळिंब, टरबूज, पपईचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली.

avkali_rain2 (1)उस्मानाबादेत शेतीचं नुकसान

दुष्काळाने होरपळत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं चांगलंच झोडपून काढलंय. यात शेतकर्‍यांच्या पिकाचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता कोलमडला असून यात पिकांचे व फळबागासह पॉली हाऊसचं मोठं नुकसान झालंय. तर वादळी वार्‍यामुळे अनेक शेतकर्‍यांची पत्र्याची घरं उडून गेली आहेत. जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यात पाऊसासह वादळी वार्‍याने शेतीचे प्रचंड नुकसान झालंय. शेतकर्‍यांनी शेतातील ज्वारी काढून ठेवली होती मात्र अनकाळी पावसानं मोठं नुकसान झालंय.

चिमूरमध्ये बालाजी घोडायात्रेत दाणादाणavkali_rain2

चंद्रपूर जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसाचा सर्वाधिक फटका चिमूर तालूक्याला बसला आहे. चिमूरमध्ये प्रसिद्ध बालाजी घोडायात्रा सुरू आहे. या यात्रेत मोठ्या प्रमाणात दुकानं होती. पाऊस आणि सोसाट्याच्या वार्‍यानं ही दुकानं जमिनदोस्त झालीयेत. या यात्रेत 100 च्या जवळपास खेळणी साहित्य आणि इतर वस्तूंची विक्री करणारे दुकानं पडली आणि दुकानातलं साहित्यही वाहून गेलंय. दरम्यान, पाऊस आणि सोसाट्याच्या वार्‍यामुळे गडचिरोली दोनशे गावांचा वीज पुरवठा खंडीत झालाय. आलापल्ली ते सिरोंचा लाईनमध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे. त्यामुळं सिरोंचा अहेरी तालुक्यातली दोनशे गाव अंधारात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2016 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close