S M L

केडीएमसीचे उपमहापौर विक्रम तरेंची पत्नीला बेदम मारहाण

Sachin Salve | Updated On: Mar 1, 2016 01:17 PM IST

केडीएमसीचे उपमहापौर विक्रम तरेंची पत्नीला बेदम मारहाण

कल्याण - 01 मार्च : कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपमहापौर विक्रम तरे यांनी आपली पत्नीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तरे यांच्या पत्नी मोनाली तरे या भाजपच्या नगरसेविका आहे. त्यांच्या तक्रारीवरुन विक्रम तरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

उपमहापौर विक्रम तरे हे उपमहापौर असून मोनाली विक्रम तरे ही त्यांची पत्नी आहे. बेदम मारहाण केल्याची तक्रार मोनालीने

कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली आहे. त्यांच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी भादवी कलम 323 आणि 504 प्रमाणे अदाखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या लोक प्रतिनिधींचा हाणामारी चव्हाट्यावर आल्याने एकच खळखळ उडाली आहे. अशा प्रकारे हे लोक प्रतिनिधी वागत असतील तर जनतेची सेवा काय करणार असा सवाल उपस्थित होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2016 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close