S M L

भारताची आशिया कपच्या फायनलमध्ये धडक

Samruddha Bhambure | Updated On: Mar 2, 2016 08:48 AM IST

भारताची आशिया कपच्या फायनलमध्ये धडक

êÖêËÖêêËÖêêËy

01 मार्च :   आशिया कपमध्ये भारताने श्रीलंकेविरोधात 5 गडी राखून विजय मिळवला आहे. पहिल्यांदा फलदांजी करताना श्रीलंकेने 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 138 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारताचा 139 धावांचे लक्ष्य मिळालं. भारताने 19.2 ओव्हर्समध्ये हा विजय मिळवला असून 56 धावा काढून विराट कोहली नॉट आऊट राहिला.

टीम इंडियाला पहिला झटका 11 धावांवर बसला. शिखर धवन 1 रन काढून बाद झाला. तर स्कोअर 16 असताना रोहित शर्मा (15) कुलशेखराच्या बॉलवर आऊट झाला. त्यानंतर सुरेश रैनाच्या रूपात भारताला तिसरा झटका बसला. तो 25 रन्स काढून बाद झाला. युवराजसिंग 35 धावा काढून बाद झाला, त्यानंतर पांड्या केवळ 2 धावांवर तंबूत परतला.

त्यापूर्वी भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेला 6 धावांवर पहिला तर, 15 धावांवर दुसरा धक्का बसला. थिसरा परेराने अखेरच्या तीन षटकांत फटकेबाजी केल्याने श्रीलंकेने 100 धावांचा टप्पा ओलांडला. श्रीलंकेकडून कपुगेंदरा आणि श्रीवर्धनमध्ये पाचव्या विकेटसाठी सर्वाधिक 43 धावांची भागीदारी झाली. भारताकडून बुमराह, पांडया आणि अश्विनने प्रत्येकी 2 तर नेहराने एक गडी बाद केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2016 10:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close