S M L

अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्तांना मदत जाहीर

Samruddha Bhambure | Updated On: Mar 1, 2016 10:13 PM IST

Eknath khasse

01 मार्च : राज्यात सध्या अवकाळी पावसानं आणि गारपीटीनं थैमान घातलं आहे. यामुळे शेतकरी अगदीच मेताकुटीला आला आहे. आशा वेळी शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी मदत जाहीर केली आहे. राज्यात नुकसान झालेल्या भागाचा पंचनामा करण्याच्या सुचना एकनाथ खडसेंनी दिल्या आहे.

पुढच्या 4 ते 5 दिवसात पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अवकाळी पावसामुळे व्यक्तीच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तसंच कोरडवाहू क्षेत्रात नुकसान झाल्यास 6500 रुपये प्रति हेक्टरी तर बहुवार्षिक पिकांसाठी 18 हजार प्रति हेकटरी मदत मिळेल. त्याचबरोबर, बागायतीसाठी 13,500 प्रति हेक्टरी, तर पशुधन प्रति म्हैस गाय 30 हजार, बैल 25 हजार, गाढव ,रेडकू, 15 हजार, शेळी मेंढी 3 हजार प्रति अशी मदत मिळणार असल्याचं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2016 07:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close