S M L

नाशिकमध्ये 1348 धार्मिक स्थळांवर होणार अतिक्रमणाची कारवाई

Sachin Salve | Updated On: Mar 2, 2016 08:53 AM IST

नाशिकमध्ये 1348 धार्मिक स्थळांवर होणार अतिक्रमणाची कारवाई

नाशिक - 02 मार्च : 3 मार्चपासून शहरातल्या अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा पुन्हा एकदा पडणार आहे. पण हे अतिक्रमण आहे शहरातल्या 1348 धार्मिक स्थळांचं...हायकोर्टाच्या आदेशानं पालिका आणि पोलीस ही संयुक्त कारवाई करणार आहेत.

शहरातल्या धार्मिक स्थळांचं अतिक्रमण तोडलं जाणार असल्यानं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 2009 ला याच प्रकारची वादात सापडली होती. हायकोर्टाच्या आदेशानुसार आतापर्यंत 2 वेळा पोलीस आणि प्रशासनानं संयुक्त सर्वेक्षण केलं होतं. याचा अहवाल उच्च न्यायालयात 9 महिन्यांपूर्वी सादर केला होता. पण कुंभमेळा असल्यानं ही मोहिम थंडावली होती. पण हायकोर्टाने कडक ताशेरे ओढल्यानं धार्मिक स्थळांचं अतीक्रमण हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2016 08:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close