S M L

दहशतवादीच !,मृत्यूनंतर माझी संपत्ती जिहादसाठी वापरा, लादेनची होती इच्छा

Sachin Salve | Updated On: Mar 2, 2016 12:32 PM IST

दहशतवादीच !,मृत्यूनंतर माझी संपत्ती जिहादसाठी वापरा, लादेनची होती इच्छा

अमेरिका - 01 मार्च : दहशतवादी क्रुरकर्मा ओसामा बिन लादेनबद्दलचा महत्त्वाचा खुलासा अमेरिकेनं जाहीर केलाय. आपल्या मृत्यूनंतर सर्व संपत्ती ही जिहाद आणि पाश्चात्य देशांविरोधात लढण्यासाठी वापरावी अशी लादेनची इच्छा होती. तसं त्याने मृत्यूपत्रात लिहुन ठेवलं होतं. हे पत्र अमेरिकेनं प्रसिद्ध केलंय.

अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करणार्‍या ओसामा बिन लादेनचा अमेरिकेनं मोठ्या शोधमोहिमेनंतर पाकिस्तानातील अबोटाबाद इथं 2 मे 2011 रोजी खात्मा केला. या मोहिमेबद्दल अमेरिकेनं कमालीची गुप्तता बाळगली. एवढंच काय तर त्याचा मृतदेह ही कुणाच्या हाती लागू दिला नाही. लादेनच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनंतर एक नवा खुलासा अमेरिकेनं केलाय. लादेनचं मृत्यूपत्र अमेरिकेनं प्रसिद्ध केलंय. माझी सर्व संपत्ती जिहादासाठी आणि पाश्चात्य देशांविरोधात लढण्यासाठी वापरावी, असं लादेननं लिहून ठेवलं होतं. सूदान देशात लादेनचे दोन कोटी 90 लाख डॉलर्स होते. आजच्या घडीला त्याचं मूल्य जवळपास दोनशे कोटी रुपये आहे. पण, सुदानमध्ये हे पैसे कुठे आहेत, हे कुणालाच माहित नाहीये. प्रत्येकी 2 लाख रियाल माझ्या बहिणींनीही देण्यात यावेत, असंही त्यानं लिहिलं होतं. पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये अमेरिकेनं लादेनला ठार केलं होतं. त्याच घरात ही कागदपत्रं सापडली होती. ती हल्लीच अमेरिकेनं प्रसिद्ध केली.

लादेनचं मृत्यूपत्र

"सूदानमध्ये माझे 2.9 कोटी डॉलर्स आहेत. माझ्या मृत्यूपत्राचं पालन करा आणि माझा सर्व पैसा जिहादसाठी वापरा. माझ्या बहिणींना प्रत्येकी 2 लाख रियाल दिले जावेत. माझ्याकडे असलेल्या सोन्याचं आई आणि बहिणींमध्ये वाटणी करा. माझ्या जवळच्या सहकार्‍यांनाही काही रक्कम देण्यात यावी. पण सूदानमधला सर्व पैसा पाश्चात्य देशांविरोधातल्या दहशतवादासाठीच वापरा."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2016 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close