S M L

अस्मानी संकट कायम, 'राज्यात आणखी दोन दिवस गारपीट'

Sachin Salve | Updated On: Mar 2, 2016 12:01 PM IST

Garaमुंबई - 02 मार्च : अवकाळी पावसाने गेली दोन दिवस विदर्भ, मराठवाड्याला झोडपलंय. पुढल्या दोन दिवसांमध्ये गोव्यासह संपूर्ण राज्याच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह गारपिटीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. ही स्थिती आणखी तीन दिवस राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

गेले दोन दिवस दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र ते पश्चिम मध्य प्रदेश या दरम्यान असलेली हवेच्या दाबाचे द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण कोकण -गोवा ते दक्षिण गुजरातपर्यंत आहे. त्याचा परिणाम विदर्भ, मराठवाड्यासह, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि तामिळनाडू इथल्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय. अवकाळी पावसामुळे लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 2, 2016 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close