S M L

मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 13 हजार कोटींचा लागेल खर्च !

Sachin Salve | Updated On: Mar 3, 2016 09:00 AM IST

मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 13 हजार कोटींचा लागेल खर्च !

मुंबई - 03 मार्च : मुंबईतलं ट्रॅफिक जाम आणि वाहतुकीच्या इतर समस्या प्रवाशांसाठी नेहमीचीच डोकेदुखी...या समस्या सोडवण्यासाठी येत्या 4 वर्षांमध्ये 13 हजार कोटींहुन जास्त खर्च करण्याची गरज आहे, असं एका अभ्यासात आढळून आलंय. मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थापनाबाबत हा अभ्यास करण्यात आला होता, त्याचा अहवाल महापालिकेच्या स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला.

मुंबईत अनेक ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी वाहतूक व्यवस्थापनाबाबत 'तली असोसिएट्स'या संस्थेने अहवाल तयार केला होता. या संस्थेने या हा अहवाल अलीकडेच पालिका अधिकार्‍यांकडे सादर केला. शहराच्या मध्यम आणि दीर्घ उपाययोजनांबाबत त्यात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. सध्याची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी स्वतंत्र बस मार्गिका, आवश्यक जोड रस्ता, मोनो, मेट्रोचे जाळे आदी उपाययोजना अहवालात सुचविण्यात आल्या आहेत. शहरातील आवश्यक त्या पायाभूत सुविधांसाठी 2034 पर्यंत अंदाजित 1,54,861 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे या अहवालात म्हटलंय. राज्य सरकार, पालिका, एमएमआरडीए यांसह अन्य यंत्रणांना ही खर्चाची रक्कम उभी करावी लागणार आहे.

असा करावा लागेल खर्च

- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी 13,378 कोटींची गरज

- यापैकी रस्ते आणि एक्स्प्रेस वेसाठी 4,851 कोटींची गरज

- बससाठी वेगळा रस्ता, मोनो, मेट्रोचं जाळं या उपाययोजना

- पायाभूत सुविधांसाठी 2034 पर्यंत अंदाजे 1 लाख 54 हजार 861 कोटींची गरज

- निरनिराळ्या ठिकाणी 577 वाहतूक क्षेत्रांची गरज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2016 09:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close