S M L

म्हणे,अनेक संतांना मीच पृथ्वीवर पाठवलं ; सिगारेटवाले बाबा पोलिसांच्या जाळ्यात

Sachin Salve | Updated On: Mar 3, 2016 09:31 AM IST

म्हणे,अनेक संतांना मीच पृथ्वीवर पाठवलं ; सिगारेटवाले बाबा पोलिसांच्या जाळ्यात

नागपूर - 03 मार्च : अंगारा देवून आपण कुठलाही आजार बरा करू शकतो अशा भूलथापा देवून बुवा बाजी करणार्‍या वाडीच्या एका सिगारेटवाले बाबाला पोलिसांनी गजाआड केलं आहे. वाडीच्या म्हाडा कॉलनीत दरबार भरविणार्‍या या बाबाची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर याचा भांडाफोड झाला.

सिगारेट ओढताना दिसणारा हा भोंदू बाबा अनेकांना आजार बरा करण्याच्या नावा खाली अंगारा देवून त्यांच्या कडून दक्षिणा घेत होता. या बाबाचे मूळ नाव पुरुषोत्तम बोबडे असून हा बाबा एका औषध कंपनीत नोकरी करतो आणि रविवारी सुटीच्या दिवसी तो दरबार भरवतो. पण आता तो पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. याच्याकडे अनेक जन अंध श्रद्धेपोटी आपले आजार बरा करण्यासाठी जातात. नागपुरातील एका व्यक्तीला मात्र कुठलाही आराम झाला नाही हा बनवाबनवी करत असल्याच त्याच्या निदर्शनास आल आणि त्याने अंध श्रद्धा निर्मुलन समिती कडे धाव घेतली. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने पोलिसांच्या मदतीने त्याच्या दरबारावरर धाड टाकली आणि त्याला अटक केली.

या बाबाला सिगरेट वाले बाबा म्हणून सुद्धा ओळखल्या जाते याच्याकडे येणारे त्याचे भक्त त्याच्यासाठी सिगारेट घेऊन येतात. आणि तो सिगारेटचा झुरका मारत त्यांच्यावर इलाज करतो. हा बाबा दावे सुद्धा मोठ मोठे करतो, आपला पुनर्जन्म झाल्याच तो आपल्या भक्तांना सांगतो. इतकच नाही तर आपण अनेक संताना जनकल्याणासाठी भूतलावर पाठविल्याच आपल्या भक्तांना सांगतो. पोलिसांनी त्याच्याजवळून सिगारेटची पाकिटे जप्त केली आहेत.

या ढोंगी बाबा वर पोलिसांनी ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज कायद्याच्या कलम 5 आणि 7 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याने आणखी

कुणाला गंडवलं आहे का याचा सुद्धा पोलीस तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2016 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close