S M L

राजावाडी हॉस्पिटलमध्ये वार्डबॉयकडून महिलेचा विनयभंग

Sachin Salve | Updated On: Mar 3, 2016 11:03 AM IST

राजावाडी हॉस्पिटलमध्ये वार्डबॉयकडून महिलेचा विनयभंग

 मुंबई - 03 मार्च : घाटकोपर मधील महापालिकेच्या राजावाडी हॉस्पिटलमधील एका वार्ड बॉयने रुग्णासोबत असलेल्या महिलेसोबत विनयभंग केल्याची घटना घडलीये. या वाॅर्डबाॅयला महिलांना चांगलाचं चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलाय.

राजावाडी हॉस्पिटलमध्ये रुग्णासोबत असलेल्या महिलेसोबत अतिप्रसंग केल्याची घटना नुकतीच घडलीये. हे हिनकृत्य करणार्‍या वार्डबॉयचं नाव सचिन साळवी आहे. पीडित महिलेचा भाऊ राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. या रुग्णासोबत त्याची बहिणही तिथं होती. 2 मार्चच्या रात्री ही महिला वॉर्डच्या बाहेर झोपलेली असताना रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास वार्डबॉय सचिन साळवी यानं महिलेचा विनयभंग केला. धक्कादायब बाब म्हणजे रुग्णालयातल्या नर्सेसनं या महिलेला तक्रार न करण्याचा सल्ला दिला. एवढंच नाही, तर आपल्याला भावाला इथून घेऊन जा, असंही तिला सांगण्यात आलं. त्यानंतर घाटकोपरमधल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला या महिलेनं हा प्रकार सांगितला. वॉर्डबॉयला चांगला चोप देऊन या सामाजिक कार्यकर्त्यानं वॉर्डबॉयला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2016 08:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close