S M L

संवेदनशील पटकथाकार

विनोद घाटगे, मुंबई13 मार्चउमेश कुलकर्णीचा वळू सिनेमा असेल किंवा लवकरच रिलीज होणारा विहीर. या दोन्ही सिनेमांची कथा लिहिली आहे, गिरीश कुलकर्णीने. वळूमध्ये विनोदी संवादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा गिरीश, विहीरमधून मात्र एक गंभीर विषय लोकांसमोर घेऊन येत आहे. गावच्या मातीतील विनोदवळूमध्ये गावच्या मातीतील खराखुरा विनोद गिरीशने त्याच्या लिखाणातून नेमकेपणाने टिपला. या सिनेमाची कथाच इतकी सशक्त होती की या सिनेमातील कुठलेच पात्र कृत्रिम वाटले नाही. त्यामुळे अर्थातच या सिनेमाच्या यशामागे दिग्दर्शक आणि कलाकारांइतकाच गिरीशच्या लिखाणाचाही वाटा होता.वळू सिनेमातून गिरीशमधील विनोदी लेखक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. पण फक्त कॉमेडी हाच गिरीशच्या लिखाणाचा प्रांत नाही, हे त्याने लवकरच रिलीज होणार्‍या विहीर सिनेमातून हे सिद्ध केले आहे.फिलॉसॉफिकल लिखाणया सिनेमात काहीसे फिलॉसॉफिकल वाटणारे संवादही गिरीशने लिहिलेत. विहीरचे एकूण कथानकच असे गूढ आहे, जे फक्त अनुभवता येऊ शकते. अटळ असलेला मृत्यू म्हणजे नेमके काय, हा या मुलांना पडलेला प्रश्न गिरीश त्याच्या कथेतून मांडतो.अगदी त्यांच्याच भाषेत. त्यांच्याच नजरेतून.जपलेला ग्रामीण बाजगिरीशच्या लिखाणाची आणखी एक बाजू म्हणजे त्याने जपलेला ग्रामीण बाज. वळूतील वातावरण विहीरमध्येही आपल्याला सतत जाणवत राहते. 20-25 माणसांचे भले मोठे कुटुंब, त्यांच्यातील हळुवार नाती, मायेचा ओलावा, मुलांमधील खेळकरपणा हे सगळेच, कागदावरून अगदी हुबेहुब पडद्यावर साकारले आहे.लेखक असण्याबरोबरच गिरीश एक उत्तम अभिनेताही आहे , कदाचित याच गोष्टींचा समन्वय त्याच्या लिखाणातून आपल्यासमोर येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 13, 2010 01:26 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 13, 2010 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close