S M L

सिंधुदुर्गात वाळू वाहतूकदारांच्या आंदोलनाला हिंसक वळण; नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात

Samruddha Bhambure | Updated On: Mar 5, 2016 07:58 PM IST

सिंधुदुर्गात वाळू वाहतूकदारांच्या आंदोलनाला हिंसक वळण; नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात

सिंधुदुर्ग - 05 मार्च : सिंधुदुर्गात पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकार्‍यांच्या जाचक नियम, अटी आणि कारवाई विरोधात वाळू वाहतूकदारांनी आज (शनिवारी) सकाळपासून सुरू केलेल्या आंदोलनाला दुपारी हिंसक वळण लागलं. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वाळू वाहतूकदार आणि मालक जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून, त्यांच्याची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लाठिमारही केला. दरम्यान या प्रकरणी, पोलिसांनी आमदार नितेश राणे यांच्यासह 21 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू वाहतूकदारांनी शनिवारी सकाळापासूनच त्यांच्या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. पोलीस आणि महसूल विभागाच्या कारवाईचा त्रास होत असल्याचे सांगत वाळू वाहतूकदारांनी जिल्हाधिकार्‍यांकडे यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र, जिल्हाधिकार्‍यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहून दुपारच्या सुमारास सर्व वाळू वाहतूकदारांचा जमाव नितेश राणेंच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून हा सर्व जमाव आत शिरला. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमारही केला आणि आंदोलन अधिकच भडकत गेलं. यानंतर नितेश राणेंसह आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतल आहे.

या सगळ्या घडामोडींना आता राजकीय वळण आलं असून नितेश राणे यांनी कायदा हातात घेतल्यामुळेच आंदोलकांना लाठीमार सहन करावा लागला असल्याचा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यानी केला आहे. तर हा पोलीसांच्या मदतीने केलेला वैभव नाईक यांचा पूर्वनियोजित कट असल्याच आरोप नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान खासदार विनायक राऊतही आंदोलन स्थळी दाखल झाले असून सिंधुदुर्गचे कलेक्टर हटवादी असल्यामुळेच हे आंदोलन आता अधिक तीव्र करण्याचा इशाराही राऊत यांनि दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2016 07:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close