S M L

सर, तुम्ही सुद्धा !, शिक्षकच पुरवताय विद्यार्थ्यांना कॉपी

Sachin Salve | Updated On: Mar 6, 2016 03:14 PM IST

सर, तुम्ही सुद्धा !, शिक्षकच पुरवताय विद्यार्थ्यांना कॉपी

जळगाव - 06 मार्च : कॉपीमुक्त अभियनांचे जळगाव जिल्ह्यात फज्जा उडाला असून,अमळनेर तालुक्यातील शिरुड या केंद्रावर राजरोसपणे कॉपी सुरू आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे इथं शिक्षकच मुलांना कॉपी पुरवत आहेत.

शिरुडयेथील विनायक झिपरु या शाळेवर 10 वीची परीक्षा सुरू आहे. या केंद्राच्या आवारात कॉपी पुरवण्यासाठी बिनधास्तपणे मुलं

खिड़कीतून कॉपी देतात. एवढंच नाही तर शिक्षक आपल्या वर्गातील मुलांना पेपर सोडवण्यासाठी मद्दत करता आहेत. एका एका बेंचवर दोन दोन मुलं बसून पेपर सोडवता आहेत. त्यामुळे ही खरंच बोर्डाची परीक्षा आहे का?असा प्रश्न निर्माण होतोय. यात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतलीये. पोलीस कॉपी बहाद्दरांना हटकतात पण तरीही हे बहाद्दर पोलिसांना जुमानत नाही. त्या मुळे या केंद्रावर अधिकारी कारवाई करतील का?असा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 6, 2016 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close