S M L

नितेश राणेंमुळेच डंपर आंदोलन चिघळलं, भाजप-सेनेचा आरोप

Sachin Salve | Updated On: Mar 6, 2016 06:40 PM IST

नितेश राणेंमुळेच डंपर आंदोलन चिघळलं, भाजप-सेनेचा आरोप

सिंधुदुर्ग - 06 मार्च : जिल्ह्यात वाळूवाहतूकदारांचं आंदोलन शांततेत सुरू होतं, पण काँग्रेसने स्टंटबाजी करुन हा विषय चिघळवल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलाय.

सिंधुदुर्ग वाळूवाहतूकदारांच्या आंदोलनावर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, विनायक राऊत आणि पालकमंत्री दिपक केसरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली. नितेश राणेंची ही निव्वळ स्टंटबाजी असून त्यांनीच हा प्रश्न विनाकारण चिघवळला असा आरोप माधव भंडारी आणि विनायक राऊत यांनी केला. जिल्हाधिकार्‍यांनी लाठीहल्ला केला, याचा फायदा घेवून काँग्रेसने गुंड आणून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली असा आरोप भाजप-शिवसेना नेत्यांनी केलाय. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि एसपीची तातडीनं हकालपट्टी करावी अशी मागणी खासदार विनायक राऊत, माधव भंडारी यांनी केलीये. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमलीये, याचा अहवाल येत्या तीनचार दिवसांत येईल अशी माहितीही या संयुक्त पत्रकारपरिषदेत दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 6, 2016 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close