S M L

त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी 'भूमाता'चं आंदोलन

Samruddha Bhambure | Updated On: Mar 7, 2016 11:56 AM IST

त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी 'भूमाता'चं आंदोलन

नाशिक - 07 मार्च : बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात महत्वाचे स्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सुरक्षेत आज (सोमवारी) मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात, त्यातच आता भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश मिळावा, यासाठी आंदोलन करणार आहेत. मात्र या मागणीला काही स्थानिक महिला आणि काही हिंदू संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी शनिशिंगणापूर इथे एका महिलेने शनिच्या चौथर्‍यावर जाऊन तेलाभिषेक केला होता. त्यानंतर ज्या मंदिरात महिलांना प्रवेश बंदी आहे त्या ठिकाणी प्रवेश मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. शनि चौथर्‍यावर महिलांना देखील प्रवेश मिळावा यासाठी भूमाताच्या महिलांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता आज महाशिवरात्रीला भूमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभारा प्रवेशासाठी आंदोलन करणार आहेत.

दरम्यान, भारतात स्त्री-पुरूष समानतेवर भर दिला जातो. अशा प्रश्नांवर वाद घालण्यापेक्षा सामोपचारानं, एकत्रितपणे चर्चा केली तर तोडगा नक्कीच निघू शकतो, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2016 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close