S M L

सिंधुदुर्गात डंपर आंदोलनात राजकीय फूट, शिवसेना-भाजपकडून आंदोलन स्थगित

Sachin Salve | Updated On: Mar 7, 2016 05:46 PM IST

सिंधुदुर्गात डंपर आंदोलनात राजकीय फूट, शिवसेना-भाजपकडून आंदोलन स्थगित

सिंधुदुर्ग - 07 मार्च : जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू वाहतूकदारांच्या आंदोलनात राजकीय फूट पडली आहे. आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या शिवसेना भाजपाने हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण दुसरीकडे याच आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या काँग्रेसने मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं जाहीर केलंय.

डंपर चालक मालकानी मात्र आपलं आंदोलन हे राजकीय पक्षांच्या पाठिंब्यावर नसून ते प्रशासनाच्या विरोधात असल्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांनी त्यात प्रत्यक्ष सहभागी होऊ नये अशी भूमिका घेतली आहे. डंपर चालकांनी आपली वाहनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आणून उभा केली आहे. या आंदोलनास्थळी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी भेट दिली होती. त्यांच्या या भेटीमुळे गोंधळ उडाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. तसंच नितेश राणे यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांना आता 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलंय.

दरम्यान, सिंधूदुर्गात नितेश राणे यांना पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्वाभिमान संघटनेनं आंदोलन सुरू केलंय. मुंबईतही स्वाभिमान संघटनेनं आंदोलनचा इशारा दिलाय. ऑटोरिक्षा आणि टॅक्सी बंद ठेवणार असल्याचं संघटनेनं सांगितलंय. पण, स्वाभिमान संघटनेच्या रिक्षा आणि टॅक्सींची संख्या फार नसल्यानं वाहतुकीवर फार परिणाम झालेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2016 05:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close