S M L

हॉटेलच्या पॉर्किंगमधून गाडी चोरीला, चोरी सीसीटीव्हीत कैद

Sachin Salve | Updated On: Mar 7, 2016 06:28 PM IST

हॉटेलच्या पॉर्किंगमधून गाडी चोरीला, चोरी सीसीटीव्हीत कैद

पुणे - 07 मार्च : शिवाजीनगर परिसरातील हॉटेल प्राईड या तीन तारांकित हॉटेलच्या पार्किंगमधून टोयोटो फोर्च्युनर गाडी चोरीला गेल्याची घटना घडलीये. सुरक्षारक्षकाकडे गाडीची चावी दिली खरी पण एका अज्ञात इसमाने चावी चोरून गाडी नेल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय.

या हॉटेलमध्ये मिटिंगसाठी आलेल्या प्रशांत मोहिते या उद्योगपतीने बुधवारी आपली गाडी हॉटेलच्या सुरक्षारक्षकाच्या ताब्यात पार्किंगमध्ये लावण्यासाठी दिली होती. आणि चावी दिल्याचं टोकन ही घेतलं होतं. मात्र, मिटिंग संपवून आल्यावर गाडीची चावी सुरक्षारक्षकाकडे मागितली असता चावी आणि गाडी दोन्ही ही गायब असल्याच लक्षात आलं. त्यानंतर सीसीटीव्ही बघितल्यावर चावी सुरक्षारक्षकाच्या ताब्यात असलेल्या बॉक्स मधून घेऊन जाणारा एक तरुण आढळून आलाय.

मात्र, हॉटेल प्रशासनाने गाडी त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेली असताना ही जबाबदारी घ्यायला नकार दिलाय. थ्री स्टार हॉटेल असूनही असा हलगर्जीपणा करून इतक्या महाग गाडीची चोरी होऊन ही त्याची जबाबदारी नाकारल्याबद्दल मोहिते यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केलीये.

सीसीटीव्हीमध्ये गाडी घेऊन जाणारा संशयित कैद झाला असून तो सुरक्षारक्षकाच्या टेबलमधून गाडीची चावी घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहे. या अशा घटनांनतर उच्चभ्रू कार्यक्रमाना जाताना हाॅटेलच्या पार्किंगमध्ये गाडी सोडत असाल ती सुरक्षित आहे का ? याची खात्री करून घ्या असा सल्ला ही मोहिते यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2016 06:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close