S M L

मुख्यमंत्र्यांकडून महाजनांची पाठराखण, पैनगंगा प्रकल्पात अनियमितता नाही

Sachin Salve | Updated On: Mar 7, 2016 10:50 PM IST

मुख्यमंत्र्यांकडून महाजनांची पाठराखण, पैनगंगा प्रकल्पात अनियमितता नाही

मुंबई - 07 मार्च : पैनगंगा जलसिंचन प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची जोरदार पाठराखण केलीये. या प्रकल्पात कोणतीही अनियमितता झाली नाही असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.

आयबीएन लोकमतने पैनगंगा जलसिंचन प्रकल्प घोटाळ्यात आठ पटीने वाढ झाल्याची बाब समोर आणली. या संदर्भात आज (सोमवारी) थेट मुख्यमंत्री कार्यालयातूनच स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पैनगंगा प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या म्हणजे यापूर्वीची झालेली अनियमितता मान्य केली असे नाही. या झालेल्या अनियमिततेबाबत चौकशी पूर्ण करुन ती तडीस नेण्याचा शासनाचा निर्धार आहे असं या पत्रात म्हटलंय. यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. सिंचनाची चौकशी सुरू ठेवूनच पैनगंगा नदीवरील बॅरेजेसचे काम करणार असल्याचंही मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2016 10:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close