S M L

मुलाप्रमाणे मुलींनीही आईवडिलांची जबाबदारी घ्यावी, नागपूर कोर्टाचा निर्णय

Sachin Salve | Updated On: Mar 8, 2016 04:30 PM IST

मुलाप्रमाणे मुलींनीही आईवडिलांची जबाबदारी घ्यावी, नागपूर कोर्टाचा निर्णय

नागपूर - 08 मार्च : वृद्ध आईवडिलांना म्हातारपणात जगण्याचा आधार नसेल तर फक्त कमावता मुलगाच नव्हे तर कमावती मुलगी सुद्धा आईवडिलांना सांभाळणासाठी जबाबदार असलाचा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाचा ने दिलाय.

फक्त मुलीचे लग्न झाले म्हणून तिचे आईवडिलांच्या प्रतिचे कर्तव्य संपत नाही असेही हायकोर्टाने स्पष्ट केलंय. अमरावतीच्या एका सदन

शेतकरी दाम्पताने आपली 15 एकर शेती विकून आपल्या दोन मुलांना आणि एका मुलीला परदेशात शिक्षणासाठी पाठवलं. ती पुढे

परदेशातच स्थायिक झाली. दरम्यान, मुलांनी आपली आर्थिक स्थिती चांगली नसल्याने मुलीलाही आईवडिलांना सांभाळण्याची जबाबदारी उचलावी, अशी मागणी करत थेट हायकोर्टात धाव घेतली. याच खटल्यात हायकोर्टाने लग्नानंतरही मुलीने आईवडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी उचलावी, असा महत्वपूर्ण निकाल दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2016 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close